कोल्हापूर महानगरपालिकेने चालविलेली बहुजन सुखाय असे ब्रीदवाक्य धारण करणारी राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूल हिचा शुभारंभ भृतपूर्व नगरपरिषदेने सन १९५४ साली केला.इवलेसे रोप लावियले दारी । तयाचा वेलू गेला गगनावरी । या युक्तीनसार प्रथम छोट्याशा जागेत सुरू झालेली जागा आज सर्व सोयीनी समृध्द असणा-या दुमजली प्रशस्त इमारतीत सुरू आहे.
जिजाबाई गर्ल्स हायस्कूल वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थिनींना महानगरपालिकेतर्फे मोफत युनिफॉर्म देण्या येतात.कोणत्याही कारणासाठी वर्गणी घेतली जात नाही.विद्यार्थिनींना पुस्तक पेढीमधून क्रमिक पुस्तके व वह्या देण्यात येतात.अद्यावत लॅब विभाग सुरू आहे.
महानगरपालिकेचे एकमेव मुलींचे हायस्कूल असून ह्या हायस्कूलमधून शिक्षण घेतलेल्या अनेक माजी विद्यार्थानी अनेक क्षेत्रात दिसतात.गतसालच्या उपमहापौर श्रीमती माईसाहेब रेडेकर,सध्याच्या नगरसेविका सौ.यशोदा प्रकाश मोहिते व सौ.शालिनी सर्जेराव पाटील ह्या हायस्कूलच्या माजी विद्यार्थानी आहेत.हायस्कूलमधील सर्व शिक्षक विद्यार्थानिंच्या पालकांशी सतत संपर्क ठेवून अभ्यासाच्या प्रगतिबद्दल सूचना करतात.इयत्ता १० वी साठी शाळेच्या वेळे व्यतिरीक्त व सुटीमध्ये अभ्यासवर्ग घेऊन चांगल्या प्रकारे निकाल लागण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करतात.अनेक उपक्रमामंध्ये स्पर्धेमध्ये हायस्कूलचा सहभाग प्रकर्षाने जाणवतो. महापालिकेची १००% अनुदान प्राप्त असलेल्या हायस्कूलमध्ये सन १९५४ पासुन ९ मुख्याध्यापक झाले.आज २१ शिक्षक व ८ शिक्षकेतर सेवक कार्यरत आहेत.
Tuesday, December 22, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment