ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती माझ्या प्रत्येक आईच्या डोळयात पाहा काय दिसते. व्यसना दूर रहा! आपलाच एक जिजाऊ भक्त ! call:09595481717 Home राजमाताजिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे मराठाआरक्षण आण्णासाहेब चौधरी नौकरी: सौजन्य महान्यूज

Friday, December 25, 2009

राष्ट्रमाता-राजमाता जिजाऊ मासाहेब

राष्ट्रमाता-राजमाता जिजाऊ मासाहेब
जय जिजाऊ,
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, राष्ट्रमाता-राजमाता जिजाऊ मासाहेब , स्वराज्य संस्थापक युगपुरूष छ्त्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज ह्या सर्वांना नतमस्तक होऊन आम्ही लवकरच आपल्या समोर ही वेबसाइट घेऊन येत आहोत.सबंध हिंदुस्थानातील मातांना नव्हे तर या विश्वातील मातृत्वा साठी एक आदर्श असणारी माता म्हणजे मातोश्री जिजाऊ! ज्या काळी सारी रयत, सारे राष्ट्र हे जुलमी राजवटी खाली अन्याय सहन करत होते , जेव्हा यवनांकडून हे राज्य रोज बाटवले जात होते, आया-बहिणींच्या अब्रू दिवसा ढवळया लुटल्या जात होत्या, शेतकर्यांचे-मजुरांचे धान्य लुटले जाई, आणि आपलेच लोक परकीयांच्या पायाशी आपली निष्ठा बाळगण्यातच आपला मोठेपणा समजत होते, सह्याद्रीला ही लाजेने आपली मान खाली घालावी लागेल असला तो कठीण काळ होता. अवघा मराठी मावळ एका घोर पारतंत्र्याच्या अंधारात बुडालेला होता. तेव्हा त्या माऊलीने स्वराज्याच एक देखण स्वप्न पाहील. सह्याद्रीच्या कड्या-कपार्‍यातून स्वातंत्र्याची पहाट घेऊन येणारा किरण जिजाऊ पोटी जन्माला आला. त्या माऊलिने पाहिलेले सुंदर स्वप्न प्रत्यक्षात साकारण्या करिता जिजाऊ पोटी शिवबा ने जन्म घेतला. आई च्या गर्भातच ज्याला लढण्याची आणि जिंकण्याची ही रीत उमगली. अन्याया विरुद्ध लढ्याची प्रेरणा ज्याला जिजाऊ कडून भेटली आणि यवनी सत्तेचा अंत करून एका अभेद्य हिंदवी स्वराज्याची, मराठी साम्राज्याची स्थापना जिजाऊंच्या आशिर्वादाने शिवबा च्या हाताने झाली. धन्य ती माऊली आणि धन्य ते शिवराय! त्या थोर मातेस आणि तिच्या मातृत्वाला आमचा मुजरा, त्रिवार मुजरा!
या विश्वातील सार्‍या मातांना! आणि मातृत्वाच्या त्या पवित्र नात्यास आम्ही नतमस्तक होतो !

तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तसेच वेब-साइट निर्मिती साठी चे योगदान आम्हास अपेक्षित आहेत.

अंधार होत चाललाय दिवा पाहीजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे ॥

No comments:

Post a Comment