ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती माझ्या प्रत्येक आईच्या डोळयात पाहा काय दिसते. व्यसना दूर रहा! आपलाच एक जिजाऊ भक्त ! call:09595481717 Home राजमाताजिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे मराठाआरक्षण आण्णासाहेब चौधरी नौकरी: सौजन्य महान्यूज

Monday, February 1, 2010

राजमाता जिजाऊ योजनेंतर्गत मोफत सायकल वाटप

राजमाता जिजाऊ योजनेंतर्गत मोफत सायकल वाटप


नांदेड,दि ९ (प्रतिनिधी) ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणा बाबत पालक उदासीनता बाळगून आहेत शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवणे चालू केले आहे राजमाता जिजाऊ योजनेंतर्गत दारिद्र रेषेखालील पाल्यांच्या मुलींना मोफत सायकलीचे वाटप दरवर्षी केले जाते चालू वर्षीही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थीनींकडून अर्ज मागवले जात असल्याची माहिती जि प माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली

दारिद्रयरेषेखालील पालकांच्या मुलींसाठी राजमाता जिजाऊ योजनेंतर्गत मोफत सायकलीचे वाटप केले जाते शासनमान्य अनुदानीत शाळेत शिकणाऱ्या दारिद्रयरेषेखालील विद्यार्थीनीसाठीच ही योजना उपलब्ध आहे ग्रामीण भागातील मुलींना थोड्या अंतरावरील शाळेत जाणेयेणे सोपे व्हावे, निव्वळ शाळा दूर आहे या कारणाने त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, शाळेमधील मुलींचे प्रमाण वाढावे त्याशिक्षणाकडे आकर्षित व्हाव्यात हा या योजनेमागील उद्देश आहे

इयत्ता आठव्या वर्गातील दारिद्ररेषेखालील मुली या लाभासाठी पात्र आहेत, ग्रामीण भाग व क वर्गातील नगरपालिका क्षेत्रातच ही योजना लागू राहील लाभार्थीचे घर व शाळेतील किमान अंतर दोन किमी इतके अपेक्षित आहे इतर योजनेतून सायकल मिळाल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही इयत्ता सातविमध्ये किमान ४५ टक्के गुण घेणाऱ्या मुलींसाठीच सदर योजना उपलब्ध आहे दुर्गम , अतिदुर्गम ग्रामीण भाग, शहरी भागातील झोपडपट्टी, गलिच्छ वस्त्यांमधील लाभाथर्नीां प्राधान्य आहे या निकषात बसणाऱ्या मुलींची माहिती तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे दि १३ जानेवारी पर्यंत सादर करावी असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि प नांदेड यांनी कळविले

No comments:

Post a Comment